अक्षय वाढदिवसाच्या शुभेच्छा
'अक्षय' म्हणजे कधीच 'क्षय' न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. साडेतीन मुहूर्त पैकी एक शुभ मुहूर्त ही 'अक्षय' मानला जातो. 'अक्षय' तिथीला नरनारायण, परशुराम, हयग्रीव यांचा जन्मसुध्दा या तिथीलाच झाला. या दिवसापासून त्रेतायुगाचा प्रारंभही झाल्याची महती आहेच. आपल्या परिवारातील, आधुनिक जगाशी मैत्री करणारे 'अक्षय' सर्वांशी अनुकूल वातावरण निर्माण करत असतात. काही समस्या असेल तर ती लक्षपूर्वक सोडवतात त्यासाठी स्वतःला झोकून देतात. 'उदार' मनाने सर्व परिवार मित्रांसोबत वागतात. 'अक्षय' नावाचे अर्थ बघितले तर 'भाग्यवान, उदार, आधुनिक, अनुकूल, सक्षम, आनंदी, सक्रिय, सर्जनशील, गंभीर, स्वैच्छिक, अस्थिर आणि लक्षपूर्वक' असे आहेत. या प्रत्येक शब्दांमधील असलेले गुणवैशिष्ट अक्षयच्या आचरणात दिसते.
*आज अक्षयची जन्यतिथी- जन्मदिवस. त्यानिमित्त आरोग्यपूर्ण 'अक्षय' शुभेच्छा!*
*देवेंद्र पाटील आणि परिवार*
Comments
Post a Comment