‘धना’च्या वादात ‘कणा’ची हानी!
धन नको मात्र कण असो! अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलीत आहे. मात्र जेव्हा जेव्हा धनाचा वाद उद्भवला तेव्हा तेव्हा कणाचीच हानी झाली आहे. अशाच काहीसा प्रकार भादली हत्याकांडामधील दिव्या व चेतन या निष्पाप निरागस चिमुकल्यांचा हत्येनंतर समोर आला आहे. प्रदीप व संगीता यांच्या हत्येचाही करावा तितका निषेध कमीच आहे. मात्र ज्या निरागस बालकांना धन काय आणि गुन्हेगार कोण? याची पुटकशीसुध्दा कल्पना नसलेल्या लहान बालकांच्या हत्येमूळे मारेकराच्या विकृतीचे दर्शन समोर आले आहे.
भादली हत्याकांडामूळे जळगाव जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरले आहे. माणुसकीच्या क्रुर विकृतीचे दर्शन या घटनेतून घडले असेच म्हणावे लागेल. हा गुन्हा गंभीर असूनही त्यातील ठोस कारण वगैरे अजुनही समोर येत नाही. शेतीच्या व्यवहारातुन हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात सांगण्यात आले असले तरी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. गुन्हाचा शोधही लागेल संशयितही पकडले जातील. मात्र ज्यांना गुन्हा काय आणि गुन्हेगार कोण? धन, मालमत्ता काय असते याची जाणीवही नसलेले कण म्हणजे दोघं चिमुकल्यांच्या हत्येने गुन्हेगारांची क्रुरतेची वृत्ती दिसुन आली. गुन्हाचा उलगडा करण्यासाठी पोलीस यंत्रणा समक्ष आहेत. मात्र गावकर्यांचे भितीपोटी तोंडावर लावलेले कुलूप अद्यापही यंत्रणा उघडू शकली नाही. ही खेदाची बाबच म्हणावी लागेल. पाच फुटांची गल्ली अन् कुडाचे घर साधं भांडे पडले तरी गल्लीत आवाज जाईल. अश्या परिस्थीतीजन्य वातावरणात भोळे कुटूंबियांचे घर असतांनाही कोणाताही आवाज बाहेर न आल्याचे शेजारांच्या जाब जबाबात सांगण्यात आले. यातुनच घटनेबाबत नागरीकांच्या मनात निर्माण झालेली भिती किती आहे हे स्पष्ट होते. जळगावच्या सर्व वरिष्ठ अधिकार्यांसह नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनीही घटनास्थळी भेट देवून आजुबाजुच्या नागरीकांना घटनेची माहिती देण्याचे आवाहन केले. मात्र वाढलेल्या चोरी, घरफोडी, हाणामारीच्या घटनांमूळे पोलीस आपले संरक्षण करु शकतील काय? अशी शंका नागरीकांमध्ये निर्माझ झाली असल्याचे म्हणणे वास्तवाचे आहे. यामुळेच घटनेतील संशयितांबाबत पुरावे देण्यास किंवा माहिती देण्यास नागरीक पुढे येत नाही. हेही तितकेच खरे! परंतु घटना घडली आहे. मारेकरांचा पोलीसांच्या शोध कक्षेत आहेत. मात्र ज्यासाठी धन कमावित आहे. असे आपले लेकरुबाळांची सुध्दा दिव्या व चेतन या कणासारखे हाणी होवु नये. यासाठी तरी नागरीकांनी पुढे यावे हीच माफक अपेक्षा!
देवेंद्र पाटील ९६७३९३४६१८
Comments
Post a Comment