तलवार बाळगुण दहशत निर्माण करणार्या तरुणाला कांचननगरमधुन अटक
जैनाबादमध्ये गावठी पिस्तुलासह एकाला अटक केल्यानंतर शनिपेठ पोलीसांनी सलग दुसर्या दिवशी तलवार बाळगुण दहशत निर्माण करणार्या तरुणाला कांचननगरमधुन अटक केली आहे. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, कांचननगर परीसरातील सदगुरु किराणा दुकानाजवळ तलवार घेवून तरुण दहशत निर्माण करीत असल्याची माहिती शनिपेठ पोलीसांना मिळाली. यावेळी त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती़ ही घटना शनिपेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली. गस्तीवर असलेले पोहेकॉ मोतीलाल पाटील, नरेश सपकाळे, पोना. अनिल धांडे, मिलींद कंक, योगेश वाघ, अमीत बावीस्कर, गणेश गव्हाळे, यांच्या पथकाने सकाळी ११़ ३० वाजेच्या सुमारास घटनास्थळी जावून चौकशी केली. यावेळी तेथे भुषण दिलीप सपकाळे (वय १९) हा तरूण त्यांच्या हाताच जूनी तलवार घेवून कांचननगर परीसरातील सदगुरू किराणा दुकानाजवळ उभा असल्याचे दिसुन आले. पोलीसांनी संशयीतास ताब्यात घेत त्यांच्या कडील तलवार सुध्दा जप्त केली आहे़ काळपट रंगाची २७ इंच लाबीची तलवार असुन ५ इंच ६ सेंमी मुठ व पाते १ इंच १० से़मीचे आहे़ याघटनेसंदर्भात पो.ऩा. ़जितेंद्र सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत भुषण सपकाळे यांच्याविरूध्द शनिपेठ पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस ऍक्ट ३७(१)(३) चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
Comments
Post a Comment